15 August 2020

News Flash

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी बसचा अपघात; १ ठार १५ प्रवासी जखमी

या अपघातातील जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका लक्झरी बसचा अपघात होऊन एक जण ठार तर १५ प्रवासी जखमी झाले आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिल्हार फाट्याजवळच्या उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातातल्या काही जखमींना मनोर येथील शासकीय रुग्णालयात तर काही जखमींना नागझरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एक मालवाहू ट्रक गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात होता. उड्डाणपुलावरुन हा ट्रक मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असतानाच मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या एका लक्झरी बसला या ट्रकने धडक दिली. त्यामुळे बस उलटली आणि हा अपघात झाला. अपघातानंतर काही वेळ कोणतीही शासकीय मदत या ठिकाणी पोहचली नव्हती. मात्र स्थानिकांना मदतकार्य सुरु केले. त्यानंतर शासकीय मदत पोहचली आणि जखमींना घटनास्थळावरुन रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत.

अलीकडेच रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला असला तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने महामार्गावरील अपघात वाढत असून या अपघातात नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत.यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 8:20 pm

Web Title: accident at mumbai ahmadabad highway one dead 15 injured scj 81
Next Stories
1 वाडिया रुग्णालयायासाठी ४६ कोटी देणार, अजित पवार यांचं शर्मिला ठाकरेंना आश्वासन
2 “प्रामाणिक प्रयत्न कर, लागेल ती मदत करतो”, चणे-फुटाणे विकून शिक्षण घेणाऱ्या तरुणाला उद्धव ठाकरेंचा शब्द
3 उदयनराजेंना भाजपासमोर लोटांगणाशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक
Just Now!
X