कोकण रेल्वेचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल गाडीचा रविवारी सुदैवाने भीषण अपघात टळला. हॉलिडे एक्सप्रेस करमाळीवरुन सीएसएमटीच्या दिशेने येत असताना अचानक इंजिन डबे सोडून पुढे निघून गेले.

कणकवली ते सिंधुदुर्ग स्थानका दरम्यान ही घटना घडली. इंजिन डबे सोडून पुढे निघून गेल्यानंतर सुदैवाने डबे रुळावरच थांबले अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता. हजारो प्रवासी यावेळी हॉलिडे स्पेशलमध्ये होते.

इंजिन डबे सोडून पुढे निघून आल्याचे लक्षात आल्यानंतर इंजिन चालकाने पुन्हा ते डबे जोडले. कोकण रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. इंजिन आणि डब्यामधील कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडली.