News Flash

मित्राचा अंत्यविधी करून परतणाऱ्या तरूणावर काळाचा घाला

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तिघे जखमी

प्रतिकात्मक छायाचित्र

मित्राचा अंत्यविधी अटोपल्यानंतर दुचाकीवर परत येत असतांना भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. हा भिषण अपघात शुक्रवारी (दि.१८) पहाटे २ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील पटेल लॉन्सजवळ घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल खान तालेब खान (वय २०,रा.जुनाबाजार) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेख वसीम शेख लतीफ (वय १९), शेख हमजा शेख हमीद (वय १९), दोघे रा.जुनाबाजार, शेख आमेर शेख बाबू (वय १९, रा.जुना बाजार पोस्ट ऑफीस जवळ) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. चौघेही मित्र गुरूवारी (दि.१७) रात्री आपल्या मित्राच्या अंत्यविधीसाठी सातारा परिसरात गेले होते. मित्राचा अंत्यविधी अटोपल्यावर चौघेही एकाच दुचाकीवर बीडबायपास रोडने शहराकडे येत होते. रात्री २ वाजेच्या सुमारास चौघेही मित्र लघुशंका करण्यासाठी पटेल लॉन्सजवळील मिनाज हॉटेल समोर थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली.

अपघातानंतर टँकर चालकाने टँकरसह घटनास्थळावरून धुम ठोकली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक मदतीसाठी धावले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर सातारा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चौघांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. दरम्यान घाटीतील डॉक्टरांनी सोहेल खान तालेब खान यास तपासून मयत घोषीत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 8:59 pm

Web Title: accident in beed baypass aurngabad
Next Stories
1 ३ महिन्यानंतरही कांद्याला मिळेना भाव, आता शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत
2 उकळत्या गुळाच्या काहिलीत उडी मारुन कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न 
3 बारामतीत या, तुम्हाला दाखवतोच! अजित पवारांचा महाजनांना इशारा
Just Now!
X