26 February 2021

News Flash

काळाचा घाला, ट्रॅक्टर नाल्यात उलटून आठ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

चालकाच्या चुकीमुळे आठ जणांचा मृत्यू

(सांकेतिक छायाचित्र)

बेळगावजवळ झालेल्या एका भीषण अपघातात आठ ऊसतोड कामरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३० जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मयत बोगुर गावचे राहणारे आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी आणि भीषण अपघात झाला. खानापूर तालुक्यातील बोगुर गावानजीक बोगुर इटगी रोडवर असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाला. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅक्टरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून येत होते. यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघाताने क्षणांत अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:15 pm

Web Title: accident in belgaon eight dead tractor nck 90
Next Stories
1 VIDEO: रायबा किल्लेदार असलेल्या पारगडची पंतप्रधान मोदींकडून दखल
2 हिंगणघाट पीडितेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी, उद्योजक आनंद महिंद्रांच भावनिक ट्विट
3 टी-शर्ट, व्हिडीओ, बॅनर: घुसखोरांविरुद्ध महामोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी
Just Now!
X