News Flash

कार्तिकी एकादशीच्या दिवशीच पंढरपूरमध्ये अपघात, ५ वारकरी जागीच ठार

पाच वारकरी अपघातात जागीच ठार झाले

कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात पाच वारकरी ठार झाले आहेत. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत वारकरी हे बेळगावातील मांडोळी व हंगरगा गावातले रहिवासी आहेत.

एका टेम्पोमध्ये बसून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. या टेम्पोला विटांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला. दोन जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कार्तिकी एकादशीनिमित्त बेळगावहून पंढरपूरला जात असताना टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील पाच वारकरी ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील लोक खासगी टेम्पोमधून कार्तिकी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनासाठी जात होते वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. मृतांत हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे.

सध्या पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 9:28 am

Web Title: accident in pandharpur 5 warkari death on the spot scj 81
Next Stories
1 कर्ज फेडण्यावरून वाद; सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांना पेट्रोल टाकून पेटवलं
2 राज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होणार ? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
3 माणगावमध्ये तिहेरी हत्याकांड
Just Now!
X