News Flash

सोलापूर : बार्शीजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; बसचा चेंदामेंदा

या भीषण अपघातांमध्ये बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर मालट्रक आणि बसच्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पराग हॉटेलजवळ उभ्या असलेल्या मालट्रकला (एमएच १७ बीडी ७७२४) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने (एमएच२० बीएल ३८२१) पाठीमागून जोरदार धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बस आणि मालट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये लातूर जिल्ह्यातील बस चालकासह अन्य एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना बार्शी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसचालक सुधाकर होळकर (रा.लातूर) व दिनेश कुमुटवार (रा.केज ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळवार दाखल झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 11:54 am

Web Title: accident near barshi 2 dead nck 90
Next Stories
1 घटनाक्रम: शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यापासून काय काय घडलं
2 कुटुंबाला वाचविले; पण कर्ता वाहून गेला
3 कोळसा टंचाईमुळे राज्यावर अंधाराचे सावट!
Just Now!
X