News Flash

देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात, सोलापूरचे पाच जण ठार

तीन जण गंभीर जखमी

( सांकेतिक छायाचित्र)

देवदर्शनावरून परतताना सोलापूरातील पाच जणांचा अपघातील मृत्यू झाला आहे. गुलबर्गाजवळील असलेल्या आळंद येथे मंगळवारी पहाटे अपघात झाला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूरच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावण सोमवारनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावातील एक कुटुंबीय देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. देवदर्शन आटोपून घराकडे परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे काळाने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल केले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच चिंचपूर गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 9:54 am

Web Title: accident near gulbarag five people dead from solapur nck 90
Next Stories
1 प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
2 सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेने रोखला जानकरांवर बाण!
3 बँक घोटाळा : शरद पवारांवरही गुन्हा दाखल होणार?
Just Now!
X