News Flash

मलकापूरमध्ये ट्रकवर आदळली पोलिसांची कार; ४ ठार, ३ जखमी

हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकवर आदळलेली झायलो कार हवेत उडाली आणि मागून येणाऱ्या फोर्ड फिगोवर आदळली.

आरोपीसह त्याच्या ४ नातेवाईकांना घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेश येथील सिंगरोलच्या पोलीस वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकची जबरदस्त धडक बसली. यामध्ये पोलिसांच्या झायलो कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर आणखी ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. राष्ट्रीय महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील धानोराजवळ पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओव्हरटेक करताना झायलो कार नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली आणि हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकवर आदळलेली झायलो कार हवेत उडाली आणि मागून येणाऱ्या फोर्ड फिगोवर आदळली. सुदैवाने यामध्ये फोर्ड फिगोतील प्रवासी सुखरूप बचावले.

मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील सिमरोल येथील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अपहरण केल्याप्रकरणी बोरगाव मंजू येथील आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याला नेत असताना मलकापूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर धानोरा येथे हा विचित्र अपघात झाला. यामध्ये सिमरोल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक मंडलोइ व पोलिस हवालदार दीपक मनोजसह आरोपी रोहित अविनाश रायबोले हे तिघे गंभीर जखमी झाले. तर ठार झालेल्या दोघांची ओळख पटली असून त्यात सुनील गौरीशंकर परदेशी, मनोज रामकृष्ण खरेबिन यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:20 pm

Web Title: accident of police zilo car at malkapur 4 death 3 major injured
Next Stories
1 18 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर, भेटायला गेली असता केला बलात्कार
2 मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
3 वाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्हास पवार यांचा आरोप
Just Now!
X