News Flash

अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 3 महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले

मृत तिन्ही महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या

अहमदनगर-कल्याण महामार्गावर  मॉर्निंग वॉक करायला गेलेल्या तीन वृद्ध महिलांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदयपूर जवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतात जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश आहे. तर अन्य दोन मृत महिलाही त्यांच्याच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. मीराबाई ढमाले, कमलाबाई ढमाले आणि सगुणाबाई गायकर अशी अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मीराबाई, कमलाबाई आणि सगुणाबाई या पहाटेच्या वेळी नेहमी शतपावली  मॉर्निंग वॉक करायला जायच्या. आज देखील नेहमीप्रमाणे त्या अहमदनगर-कल्याण या महामार्गावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली, यामध्ये तिघींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. घटनेचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघातात जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 10:36 am

Web Title: accident on ahmednagar and kalyan highway three dead
Next Stories
1 सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप
2 चिमुकला वरद शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमवतोय!
3 दुचाकींच्या अपघातात नवदाम्पत्यासह तिघे ठार
Just Now!
X