News Flash

देवदर्शनावरून येताना झालेल्या भीषण अपघातात १० ठार ११ जखमी

देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला.

मनमाड- मुंबई- आग्रा महामार्गावर सोग्रस गावाजवळ वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात  झाला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  याशिवाय ११ जण जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वाळूच्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्यात  उभा होता. त्यावेळी भरधाव येणाऱ्या मिनीट्रॅव्हल्सने ट्रकला जोरदार धडक दिली.  हा अपघात इतका भीषण होता की, 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले होते. जखमींमधील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेले सर्वजण कल्याणचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.  हे सर्व जण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 8:14 am

Web Title: accident on mumbai agra highway between sand truck and mini travel near manmad 5 6 people lost life
Next Stories
1 मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी, लंडनवरून आलेलं विमान अहमदाबादला वळवलं
2 मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
3 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उच्च न्यायालयाची चपराक
Just Now!
X