20 September 2018

News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, सात प्रवासी जखमी

ट्रक, बस आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला आहे

रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. ट्रक, बस आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गणेशोत्सव असल्याने मुंबईतील अनेक चाकरमानी कोकणात जात असून मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी आहे. अनेक ठिकाणी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.

First Published on September 12, 2018 10:28 am

Web Title: accident on mumbai goa highway 2