27 February 2021

News Flash

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण ठार

जीप आणि मोटरसायकल यांची टक्कर झाल्याने अपघात झाला, मोटरसायकलवर बसलेले दोघेजण ठार झाले.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात मोटार सायकल आणि पिकअप जीप यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात मोटरसायकलवर बसलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. संजय निंगे आणि सुरेश नाईनाट अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. इंदापूरजवळच्या धरणवाडी या ठिकाणी हा अपघात झाल्याचे समजते आहे. हे दोघेही दापोलीतील तेटवणे या गावी राहणारे होते.

गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा आहे का? अशीही एक चर्चा होताना दिसते आहे. आज झालेला अपघात भीषण होता. या अपघातामुळे निंगे आणि नाईनाट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 5:00 am

Web Title: accident on mumbai goa highway two dead in accident
Next Stories
1 पतंगराव कदमांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विश्वजीत कदमांना उमेदवारी
2 पालघर, पलूसची पोटनिवडणूक काँग्रेस लढविणार
3 ‘रंग दे महाराष्ट्र’मधून शाळांच्या भिंती रंगल्या
Just Now!
X