26 February 2021

News Flash

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, कंटेनटरने पादचाऱ्यांना चिरडलं

अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई – नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर एका कंटेनरने पादचऱ्यांना चिरडलं असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. शहापूर तालुक्यातील आटगाव जवळ हा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर गेला. पादचाऱ्यांना चिरडत कंटेनर तसाच पुढे गेला आणि रेल्वे फाटकावर जाऊन आदळला. अंगावरुन कंटेनर गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 10:05 am

Web Title: accident on mumbai nashik highway
Next Stories
1 हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात ही लाजिरवाणी बाब – उद्धव ठाकरे
2 मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू
3 एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे
Just Now!
X