07 March 2021

News Flash

मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी काँक्रिट मिक्सर ट्रक उलटला.

| January 7, 2015 10:39 am

मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी काँक्रिट मिक्सर ट्रक उलटला. या ट्रकला उचलण्यासाठी जी क्रेन मागविण्यात आली होती तीदेखील उलटल्याने महामार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. खंडाळा घाटानजीक असणाऱ्या अमृतांजन पुलावर हा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावर तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषत: मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा या अपघातामुळे जास्त प्रमाणात खोळंबा झाला आहे. वाहतूक संथ गतीने पुढे सरकत असून ती पूर्ववत होण्यास आणखी काही तासांचा कालावधी लागेल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा अवधी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 10:39 am

Web Title: accident on mumbai pune expressway
Next Stories
1 ऊसतोडणी कामगार विकास महामंडळाचे मुख्यालय परळीत करणार
2 कोल्हापूरवासीयांना टोलप्रश्नी भाजपने फसवले
3 गुरुनाथ कटारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी
Just Now!
X