News Flash

सिन्नर शिर्डी रस्त्यावर साईभक्तांचा अपघात, ४ ठार

जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

मुंबईतील समतानगर भागातून निघालेली साइराम पालखी शिर्डीकडे पायी जात असताना या पालखीला सिन्नर शिर्डी रस्त्यावरच्या देवापूर फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना खासगी वाहनाने शिर्डीत आणले गेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत अशीही माहिती मिळते आहे. अविनाश अशोक पवार (३०), अनिकेत दिपक मेेहेत्रे (१८) या दोघांचा मृ्त्यु झाला आहे.

मुंबईतील समतानगर भागात राहाणारे हे साइभक्त असून ते पायी शिर्डीला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जी मदत पोहाचायला हवी त्यास उशीर झाल्याने साइभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 9:54 pm

Web Title: accident on sinnar shirdi road two dead 20 injured
Next Stories
1 ‘अवनी’चा एक बछडा वनविभागाकडून जेरबंद
2 साताऱ्यातच माझ्या शत्रुंची भली मोठी फौज, रामराजेंचा उदयनराजेंना टोला
3 भाजपाच्या वाचाळवीरांसाठी पंतप्रधान मोदींनी बांबूचा कारखाना काढावा-संजय राऊत
Just Now!
X