News Flash

भीषण अपघात! दुचाकीला धडक, आई आणि मुलगा फेकले गेले नदी पात्रात

वर्धा नदी पूलावर गुरुवारी संध्याकाळी मालवाहू गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

कौडण्यपूर वर्धा नदी पूलावर गुरुवारी संध्याकाळी मालवाहू गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. मालवाहू गाडीची दुचाकीला धडक बसल्यानंतर मुलगा व आई नदी पात्रात फेकले गेले. महिलेला वाचवण्यात यश आले आहे तर मुलगा बेपत्ता आहे. विभा दिवाकर राजूरकर (३०), निलेश डहाके (२३) विराज राजूरकर (४) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विभा राजूरकर या आर्वी तालुक्यातील जळगाव येथे तेराव्याच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांचा भाऊ निलेश रमेश राव डहाके हा बहिणीला सोडण्यासाठी चांदूर येथे चालला होता. दुचाकीवर चौघेजण बसले होते. विभा, निलेश यांच्यासह त्याचे दोन भाचे स्वराज दिवाकर राजूरकर (४) आणि विराज दिवाकर राजूरकर (४) सोबत होते.

आर्वी वरून कौडण्यपूरमार्गे चांदूर येथे जात असताना वर्धा नदीवर पूलावर समोरुन येणाऱ्या मालवाहू गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी कठड्याला आपटून खाली पडली. निलेश आणि विराज हे दोघे मामा-भाचे पूलावरच पडले तर विभा आणि आणि स्वराज हे दोघे मायलेक वर्धा नदीत फेकले गेले. पोलीस व नागरिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले असून चार वर्षीय मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही. या महिलेवर आणि दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 11:12 pm

Web Title: accident on wardha river bridge
Next Stories
1 वेणूगोपाल धूत, चंदा कोचर यांच्यासह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
2 महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना पर्यटकाचा मृत्यू
3 ‘पुरोहितांना सरकार महिना ५ हजार रुपये देणार मग शेतकऱ्यांना ५० हजार का देत नाही ?’
Just Now!
X