12 July 2020

News Flash

अपघातात दोन जण ठार; दोघे गंभीर जखमी

पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

अकोला : वाशीम जिल्हय़ाच्या मंगरूळपीर तालुक्यातील मोझरीनजीक ऑटो आणि बोलेरो पिकअप गाडीच्या अपघातामध्ये दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अन्वर बुरान प्यारेवाले (३५, रा.गारमाळ जि. हिंगोली) यांनी तक्रार दिली की, १४ फेब्रुवारीला पहाटे ४.३० वाजता फिर्यादीचे नातेवाईक हे अंत्यविधीकरिता कारंजा येथे ऑटोने जात असताना बोलेरो पिकअप गाडीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला जबर धडक लागली. यामध्ये पिरु हसन नंदावाले व हसीना बुरान नौरंगाबादी (४५) यांचा मृत्यू झाला. तसेच ऑटोचालक जमील कासम नौरंगाबादी व परवीन सुभान नौरंगाबादी हे गंभीर जखमी झाले. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:16 am

Web Title: accident two death two injury akp 94
Next Stories
1 महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
2 शिकारीमुळे खवले माजरांची ८० टक्के संख्या कमी
3 समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची -पवार
Just Now!
X