News Flash

साताऱ्यात २,०५९ नवे रुग्ण;३२ बाधितांचा मृत्यू

आज मंगळवारी गेल्या २४ तासात २,०५९ नवे रुग्ण निष्पन्न होताना, ३२ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कराड : सातारा जिल्ह्यत गेल्या आठवडाभरात दररोज उच्चांकी झेपावणारी रुग्णवाढ व करोनाबाधितांचा आकडा ताज्या माहितीनुसार बराच कमी झाला आहे. परंतु, करोना रुग्ण निष्पन्नतेचे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचल्याची बाब कमालीची चिंताजनक असल्याचे वैद्यकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आज मंगळवारी गेल्या २४ तासात २,०५९ नवे रुग्ण निष्पन्न होताना, ३२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरून रुग्णसंख्या जवळपास साडेपाचशेने घटताना, तुलनेत मृतांचा आकडाही कमी झाला आहे. दरम्यान, गेल्या सव्वा महिन्यात करोनाबळी व रुग्णवाढ टप्प्याटप्याने वाढताना आठवडय़ाभरात तर ती उच्चांकी झेपावल्याने ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन आज मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून येत्या सोमवारी (दि. १०) रात्री १२ वाजेपर्यंत असे सात दिवस कडक टाळेबंदीचा निर्णय काटेकोरपणे अमलात येत आहे. जिल्ह्यंची नाकाबंदी कायम असताना पोलीस व प्रशासनाने ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सातारा जिल्ह्यत शेकडो वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती टाळेबंदीनंतर दंड वसूल करून संबंधितांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या आदेशान्वये किराणा माल, भाजीपाला, दूध, फळे, मांस, अंडी आदी जीवनावश्यक वस्तू घरपोच सुविधेला मुभा दिली आहे.

जिल्ह्यत आजवर सुमारे ५ लाख ६० हजारांवर करोना संशयित समोर येताना १ लाख ११ हजार ८६३ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. पैकी २ हजार ६४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ८८ हजार रुग्ण उपचारांती बरे होऊन स्वगृही परतले आहेत. सध्या उपचाराधिनांची संख्या २१ हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन, प्राणवायू व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरूच असून, अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आरोग्य सेवासुविधेअभावी चिंतातूर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:36 am

Web Title: according latest information the number of patients ssh 93
Next Stories
1 नितीन गडकरी यांच्या सहकार्याने २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटर उपलब्ध
2 प्राणवायूची गळती थांबवण्यात प्रशासनाला यश
3 करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जाणीव, जागृतीसह खबरदारी मोहीम
Just Now!
X