News Flash

पालघर : पोलिसांच्या तावडीतून पळाला आरोपी, पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी सुरू

वसई न्यायालयात हजर करताना पोलिसांच्या तावडीतून पळाला आरोपी

( डाव्या बाजूला फरार आरोपीचं छायाचित्र, आणि पोलिसांचं संग्रहित छायाचित्र )

वसई पोलिसांनी अटक केलेला फसवणुकीच्या गुन्हातील आरोपी वसई न्यायालयात हजर करताना पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार झाल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे.

वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शब्बीर अहमद शेख (५१) याने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात नोकरी लावून देतो याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली होती. त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी त्याला अटक करुन भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“तपास अधिकारी पोलीस निरीक्षक देसाई हे शुक्रवारी आरोपी शब्बीर अहमद शेख याला वसई सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना गर्दीचा फायदा घेवून पोलिसांच्या ताब्यातून तो पळून गेला”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली. आरोपीचा कसून शोध घेतला जात असून त्यासाठी ४ पथकं रवाना झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 3:32 pm

Web Title: accused absconded from vasai police know details sas 89
Next Stories
1 Coronavirus – गृह विलगीकरणात असूनही रस्त्यांवर फिरणाऱ्यांना थेट उचलून … – फडणवीस
2 महत्वाची बातमी : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार
3 “जावडेकरांच्या आरोपांमुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं”
Just Now!
X