03 March 2021

News Flash

बीड अ‍ॅसिड हल्लाप्रकरणी आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

पीडित तरुणीला पेट्रोल टाकून पेटवूनही देण्यात आलं होतं, उपचारांदरम्यान तीचा मृत्यू झाला.

बीड येथे तरुणीवर अॅसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी अविनाश राजुरे याला सत्र न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर २४ तासांतच पोलिसांनी फरार आरोपी राजुरे याला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून रविवारी अटक केली होती.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांना याची खबर मिळताच पीडित तरुणीला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, रविवारी सकाळी या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली होती.

काय आहे प्रकरण

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली होती. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी व मृत तरुणी दोघे पुण्यात सोबत (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता. देगलूर, जि. नांदेड) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता. बीड) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा–केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल १२ तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपी अविनाश राजुरे याच्या विरुद्ध नेकनूर (ता.बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 1:50 pm

Web Title: accused in beed acid attack remanded in police custody for eight days aau 85
Next Stories
1 भाऊबीजेच्या दिवशीच भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ, शहीद ऋषीकेश जोंधळेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
2 जमावबंदीचे आदेश झुगारुन पालखी सोहळ्याचं आयोजन, पोलिसांचा लाठीचार्ज
3 महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज” – संदीप देशपांडे
Just Now!
X