28 February 2021

News Flash

पालघर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला मिर्झापूरमधून अटक

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रातिनिधिक फोटो

हेमेंद्र पाटील

पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणातील आरोपीने दोन महिलांची हत्या करून युपी मध्ये पळ काढला होता. त्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून ताब्यात घेतले आहे.  आरोपीला बोईसर मध्ये आणले जात असून त्यानंतर या खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात एक 48 वर्षीय महिला तिच्या 20 वर्षीय मुलीसोबत राहत होती. 11 डिसेंबर रोजी या दोघांचे मृतदेह बंद घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. इमारतीच्या सिसीटिव्ही फुटेजनुसार 6 डिसेंबर रोजी घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यानुसार मयत महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मयत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून याठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. आपले आडनाव पवार सांगत असलेला इसम मुळचा युपीचा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यातच मयत महिलेच्या मुलाकडून मिळालेली माहिती या सर्वांचा तपास केल्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची टिम मिर्झापूर येथे आरोपीच्या शोधत पोहोचली.

गुन्हे शाखेच्या टिमने मिर्झापूर येथून आरोपीला ताब्यात घेतले बोईसर येथे आणण्यात येत आहे. त्यानंतर नेमके खुनाचे कारण काय अशा अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:10 am

Web Title: accused in palghar double murder arrested from mirzapur abn 97
Next Stories
1 आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही!
2 जिल्ह्य़ातील ताडी व्यावसायिक हतबल
3 कवडास धरणाची उंची वाढविण्यास ग्रामस्थांचा विरोध
Just Now!
X