19 October 2020

News Flash

शाळकरी मुलीवर बलात्कार; शिक्षक आरोपीला जन्मठेप

तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : चौथीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने बुधवारी शिक्षक आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पांडुरंग श्यामराव सुतार असे या आरोपीचे नाव आहे.

पारधेवाडी (ता. भुदरगड) येथील शाळेत १० वर्षांची एक मुलगी शिकत होती. १२ जुलै २०११ रोजी शिक्षक सुतार याने तिला झाडलोट करण्याच्या बहाण्याने बोलावून अत्याचार केला होता. हा प्रकार तिने घरी सांगू नये म्हणून सुतारने तिला दोन रुपये खाऊसाठी दिले. त्या मुलीस त्रास होऊ  लागल्याने तिने सायंकाळी कामावरून परत आलेल्या आई-वडिलांना घडलेला हा प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात ९ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद व  पुरावे ग्रा मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश  ए. यू. कदम यांनी आरोपी पांडुरंग सुतार याला जन्मठेप, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलीस हवालदार एम. एम. घाटगे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:02 am

Web Title: accused teacher get life imprisonment in school girl raped
Next Stories
1 पीक कर्जाचा लाभ घेताना बँकेला २३ लाखांचा गंडा; फसवणुकीची व्याप्ती ८ कोटींपेक्षा अधिक ?
2 संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानची नऊ दिवसाची ‘दुर्गामाता दौड’ सुरु
3 उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे पेच
Just Now!
X