-सीताराम चांडे
अहमदगनरमधील शिर्डी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कोठडी सुनावली गेलेल्या एका आरोपीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जनार्दन चंद्रय्या बंडीवार असे मृत आरोपीचे नाव आहे.

आरोपीचं ताडीचं दुकान होतं, राज्य उत्पादन शुल्काच्या राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील पथकाने सोमवारी त्याला बनावट ताडी विकताना पकडलं होतं. त्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली. तर, आज (मंगळवार) त्याला कोर्टात हजर करणार होते. यासाठी राज्य उत्पादन शुल्काच्या ऑफिसमध्ये त्याला आणलं गेलं होतं. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता कोर्टात जाण्यासाठी तो बाहेर उभा असताना, त्याने लुघुशंकेला जातो असं सांगून व पोलिसांची नजर चुकवून नगर-मनमाड रस्त्यावरील बाभळेश्वर चौकात ट्रकच्या मागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली.