08 March 2021

News Flash

चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक करतानाच नंतर तिचे ठरलेले लग्न मोडून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात

| September 11, 2013 01:02 am

लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक करतानाच नंतर तिचे ठरलेले लग्न मोडून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीचा चेहरा विद्रुप करण्याची धमकी देत संशयिताने तिच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून निनाद दिलीप ढेरंगे (२५, कमल रो हाऊस, गंगापूररोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून निनादने माथेरान येथील हॉटेल व राहत्या घरी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केली. दरम्यानच्या काळात कुटुंबियांनी सचिन गोरे या युवकाशी मुलीचे लग्न निश्चित केले. परंतु, निनादने संबंधिताशी संपर्क साधून आपले युवतीशी प्रेमसंबंध आहेत, आपण तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून लग्न मोडून टाकण्यासाठी दमदाटीही केली. यामुळे संबंधित युवतीचे ठरलेले लग्न मोडले. या घटनाक्रमामुळे वैतागलेली संबंधित युवती, तिचे पालक व नातेवाईक विचारणा करण्यास गेले असता निनादने सर्वाना शिवीगाळ केली. पीडित तरुणीला तर जास्त बोलशील तर तोंडावर अ‍ॅसिड फेकून चेहरा कायमचा विद्रुप करण्याची धमकी दिली. आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही, पुन्हा घरी आलात तर पोलिसात तक्रार दाखल करेल, अशा धमक्या दिल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:02 am

Web Title: acid to throw on face threats case registered
टॅग : Face
Next Stories
1 बनावट पासपोर्टप्रकरणी सईद मुकादमला अटक
2 खारपाणपट्टय़ातील क्षारयुक्त पाणी नागरिकांसाठी जीवघेणे
3 निर्मल ग्राम पुरस्कारांची संख्या रोडावली
Just Now!
X