News Flash

पालघरमध्ये जमाबंदीची पहिली धडक कारवाई

४७ जणांवर करण्यात आली कारवाई

राज्यामध्ये आज (रविवार) रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू झालेले आहेत. दरम्यान, बोईसर आलेवाडी नांदगाव जवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी छापा टाकून ४७ जणांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे.

पालघर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत तालुक्यात सुमारे ५०० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.

होळी सणाच्या निमित्ताने शहरी भागातून अनेक एक नागरिक आपल्या मूळ गावी परतले असून आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्रिय राहणार आहे.
पालघर जिल्ह्यात ५ एप्रिल पासून दुकाने, बाजारपेठ, रिक्षा वाहतूक यांच्यावर निर्बंध लागले आहेत. तर, शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 9:46 pm

Web Title: action against 47 people in palghar msr 87
Next Stories
1 Coronavirus – “… त्याशिवाय करोनावर नियंत्रण शक्य नाही”
2 “ …तर लॉकडाउनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे”; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा
3 शरद पवार-अमित शाह भेट?; राष्ट्रवादी म्हणते नाही, शाह म्हणाले…
Just Now!
X