08 March 2021

News Flash

वाडा बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

वाडा बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत असणारी अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. वाडा शहरातून नाशिक-खर्डीकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक व्यापारी

| June 12, 2013 01:56 am

वाडा बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत असणारी अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. वाडा शहरातून नाशिक-खर्डीकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक व्यापारी तसेच हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणकर्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वी नोटीसाही दिल्या होत्या. मात्र स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी या कारवाईस खो घातला होता.
गेल्या महिन्यात शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाडा ग्रामपंचायतीस पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:56 am

Web Title: action against unauthorized work in vada market
Next Stories
1 पावसाळ्यातही आंबोली घाट सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
2 मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला!
3 संघ परिवाराचे तूर्त ‘थांबा आणि पाहा’
Just Now!
X