News Flash

रुग्णवाहिका चालकांनी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास कारवाई

समाजातील दुर्बल घटक, गरीब तसेच सर्वसामान्य नागरिक यांची आर्थिक पिळवणूक व कुचंबणा होत आहे.

 

राहाता : कोविड  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शववाहिका, रुग्णवाहिका वापरासाठी चालकांनी अतिरिक्त शुल्काची आकारणी केल्यास साथरोग अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिला आहे.

शिर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या जनतेच्या तक्रारींची पडताळणी केली असता असे निदर्शनास आले आहे, की कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका, शववाहिका सेवा पुरवठादार यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या सेवांचे दर शासनाने तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अहमदनगर यांच्याकडून निश्चित केलेले असतानासुद्धा स्थानिक पातळीवर  अतिरिक्त शुल्काची आकारणी करतात. त्यामुळे समाजातील दुर्बल घटक, गरीब तसेच सर्वसामान्य नागरिक यांची आर्थिक पिळवणूक व कुचंबणा होत आहे. यामुळे शासनाप्रती जनतेमध्ये रोष निर्माण होत आहे. अहमदनगर जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अहमदनगर यांनी दिनांक ३ जुलै, २०२० अन्वये पुढील दोन वर्षे कालावधीसाठी रुग्णवाहिकेंचे दर निश्चित केले आहेत.

या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्या मधील तरतुदीनुसार  कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे शिर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे सूचित केले आहे.

भाडेदरपत्रक रुग्णवाहिकांच्या दर्शनी भागावर करणे बंधनकारक

मारुती व्हॅन रुग्णवाहिका २५ किमी अथवा दोन तासांसाठी ७०० रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर भाडे १४ रुपये, टाटा सुमो व मॅटेडोरसदृश कंपनीने बांधणी केलेली वाहने   २५ किमी अथवा दोन तासांसाठी ८४० रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर भाडे १४ रुपये,  टाटा ४०७, माझदा आदींच्या साच्यावर बांधणी केलेली वाहने  २५ किमी अथवा दोन तासांसाठी ९८० रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर भाडे २० रुपये , आय. सी. यु. अथवा वातानुकूलित वाहने २५ किमी अथवा दोन तासांसाठी १ हजार १९० रुपये भाडे, त्यानंतर  प्रतिकिलोमीटर भाडे २४ रुपये. वरीलप्रमाणे २५ किमी किंवा दोन तासाकरिता रुग्णवाहिका वापरासाठी भाडेदर आणि किमान वापरापुढील वापरासाठी निश्चित केल्याप्रमाणे भाडे आकारणी करणे आवश्यक आहे. सदर भाडेदरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील व बाहेरील दर्शनी भागावर प्रदर्शित करणे रुग्णवाहिका मालक व चालक यांच्यासाठी बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 1:09 am

Web Title: action if ambulance drivers demand extra charges akp 94
Next Stories
1 पारनेरमधील नोंद नसलेल्या बाधितांची वाढ
2 विरारमधील आगीत १५ करोनाबाधितांचा होरपळून मृत्यू
3 सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव
Just Now!
X