News Flash

तक्रारींमुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई

शुक्रवारी औद्योगिक वसाहतीतील तीन धाब्यांसमोर मोकळ्या जागेत वाढविण्यात आलेली बांधकामे एमआयडीसीने पाडली.

(संग्रहित छायाचित्र)

तारापूर एमआयडीसीच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून स्पष्टीकरण

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमणे उभी आहेत. त्यावर गेली काही वर्षे ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र एमआयडीसीच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन धाब्यांसमोरील वाढीव बांधकाम बांधकाम तोडून कारवाईचा देखावा उभारल्याचा आरोप ढाबा मालकांनी केला आहे. तर या आरोपांचे खंडन करताना एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता संदीप बडगे यांनी तक्रारी येत असल्याने बेकायदा बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात औद्योगिक क्षेत्रातील सर्वच अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली जाईल, असे सांगितले.

शुक्रवारी औद्योगिक वसाहतीतील तीन धाब्यांसमोर मोकळ्या जागेत वाढविण्यात आलेली बांधकामे एमआयडीसीने पाडली. यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी येणार असल्याची कुणकुण लागताच धाबामालकांनी पत्रे खाली उतरवले होते.  चित्रालय भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी बाजारपेठेसाठी गाळे बांधण्यात आले होते. मात्र व्यावसायिकांनी त्यावर बेकायदा बांधकाम केली आणि दुकानांचा पसारा वाढवला. यात काही ठिकाणी कार्यालयेही उभारण्यात आली होती. गेली १० वर्षे ही बांधकामे तशीच कायम आहेत, अशी प्रतिक्रिया तारापूरमधील एका व्यावसायिकाने दिली.

तक्रारी येत असल्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल.

– संदीप बडगे, उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 2:24 am

Web Title: action on illegal constructions due complaints akp 94
Next Stories
1 अवैध रेती उत्खननावर कारवाई
2 ‘आम्हाला महापालिका हवी’
3 जम्मू काश्मीरमध्ये चाळीसगावचा जवान शहीद
Just Now!
X