आषाढी यात्रेत भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. जे अधिकारी यामध्ये हलगर्जीपणा करतील त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. सर्व विभागाने यात्रा कालवधीत सतर्क राहावे असेही त्यांनी सांगितले.

लोणीकर हे स्वच्छता अभियान आणि आषाढी यात्रापूर्व नियोजन बठकीनिमित्त पंढरपूर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे आषाढी पूर्व नियोजनाची बठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, जि. प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, नगराध्यक्षा साधना भोसले, प्रभारी मु. कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे आदी उपस्थित होते. आषाढी यात्रेला देश-विदेशातून १० ते १२ लाख वारकरी पंढरीला मोठय़ा  श्रद्धेने येतात. तसेच शेकडो मल ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी पायी चालत पंढरपूरला येतो. येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा द्या असे मंत्री लोणीकर यांनी सांगितले.  यात्रा कालावधीत जो विभाग आणि जो अधिकारी हलगर्जीपणा करेल त्यांच्या सर्वसि बुकमध्ये नोंद केली जाईल. अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दम लोणीकर यांनी दिला. उजनी धरणाचे पाणी ६ किंवा ७ जुल रोजी चंद्रभागा नदीत पाणी सोडले जाईल. २ टीएमसी पाणी सोडणार आहे. जादा पाणी सोडण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्या बरोबर पालकमंत्री यांची बठक घेऊन जास्तीचे पाणी उजनी धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पालखी मुक्कामी स्वच्छता, पिण्याचे पाणी, अखंडित वीज पुरवठा करावा अशा सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलदगतीने दर्शन व्हावे या साठी मंदिर समितीने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.

Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
ambulance caught fire in Yavatmal Fortunately four people including a pregnant woman survived
यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली; गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले