02 March 2021

News Flash

तिवरांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई

वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे मातीभराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भूमाफियांकडून कांदळवनाच्या जागेत मातीभराव;  ४७ डंपर जप्त

कांदळवन असलेल्या ठिकाणी मातीभराव करून तिवरांची कत्तल करणाऱ्या भूमाफियांवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मातीभरावासाठी वाहतूक करणारे ४७ डंपर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे मातीभराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होऊ लागला आहे. तिवरांच्या झाडांच्या जागेत भराव करून जागा बुजवण्यात आल्या आहेत. यासाठी दुसरीकडून माती वाहून येथे टाकली जात आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने माती भरावाची वाहतूक कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता केली जात होती. याबद्दल अनेक तक्रारी महसूल विभागाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन महसूल विभागाने वसई पूर्वेतील ससूनवघर या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये महसूल विभागाने माती वाहून नेणारे ४७ डंपर जप्त केले. त्यामधील दहा डंपर हे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर बाकीचे सर्व डंपर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

वसई पूर्वेतील महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा भराव केला जात आहे. या अनधिकृत भरावामुळे खाडीचे भरतीचे येणारे पाणीदेखील अडवले जाऊ  लागले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत असून संतुलनही बिघडू लागले आहे.

अनधिकृतपणे मातीभराव करणाऱ्यांची वाहने जप्त केली असून अशा सर्व वाहनांबाबतची चौकशी सुरू आहे. याबाबची सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आहे. त्यानुसार पुढील कारवाईची सुरुवात करण्यात येणार आहे.

– प्रदीप मुकणे, नायब तहसीलदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:49 am

Web Title: action on the slaughters of mangroves
Next Stories
1 शहरबात : बुलेट प्रकल्पावरून पालिका आणि शासनात संघर्ष
2 पर्ससीनधारकांचा धुमाकूळ
3 डहाणूच्या संरक्षित वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप
Just Now!
X