24 September 2020

News Flash

‘चित्रपट महामंडळातील कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला’

चित्रपट महामंडळात राजकीय प्रवृत्ती घुसल्याने सर्व कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. त्यामुळे ही कार्यकारिणीच डिसेंबरअखेर रद्द करावी, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत, असा

| December 1, 2014 03:15 am

चित्रपट महामंडळात राजकीय प्रवृत्ती घुसल्याने सर्व कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. यामुळे सध्याच्या कार्यकारिणीला पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे ही कार्यकारिणीच डिसेंबरअखेर रद्द करावी, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत, असा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाटय़ व्यावसायिक कृती समितीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
    ते म्हणाले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजवरच्या कालखंडात प्रसाद सुर्वे यांचा राजकीय हस्तक्षेप झाल्याने महामंडळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. पुणे येथे झालेल्या ‘मानाचा मुजरा’ या समारंभात ५७ लाख रुपयांचा चुराडा केला. सर्वसाधारण सभेत सुर्वेंनी महिनो न् महिने जवळ बाळगलेली रोख रक्कम रुपये ७ लाख ३४ हजार ३६३ रुपये जमा करण्यासाठी आणले, ती मी विशिष्ट कामासाठी अंडर टेबल देण्यासाठी ठेवल्याचे भर सभेत सांगून अनीतीचा बॉम्बच टाकला. अशा भ्रष्ट आणि लाच घेणा-या सुर्वे यांना अध्यक्षपदावरून खाली करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांनी केलेले बेशुध्दीचे नाटय़ आश्र्चर्यकारक होते. या सर्व प्रकरणात आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक केसेस दाखल केल्या आहेत. पण या केसेस ते महामंडळाच्या पैशाने लढत आहेत. न्यायालयीन बाब असतानाही विजय पेटकर यांना महामंडळाचे अध्यक्ष केले, ते नियमाविरुद्ध आहे. म्हणून आम्ही अद्यापही विजय कोंडकेच अध्यक्ष असल्याचे मानतो. निलंबित तीन सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कायद्याप्रमाणे काढावे, अशी भूमिका कोंडके यांनी घेतली म्हणून त्यांनाही काढून टाकण्याचा ठराव या कार्यकारिणीने घेतला. आता आम्ही जमा-खर्चाचे हिशोब मागतो, तर ते न देण्याचा ठराव त्यांनी केला असल्याचे सांगत आहेत, हा आमच्या अधिकारावरच घाला घातला जात आहे. तेव्हा या सर्वाचा विचार करून आता ही कार्यकारिणीच रद्द करावी, ही आमची मागणी आहे, ती पूर्ण न झाल्यास १ जानेवारीपासून चित्रपट महामंडळाच्या दारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला.
    पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यवाह सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, छाया सांगावकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:15 am

Web Title: actor bhalchandra kulkarni criticized film corporation
टॅग Kolhapur
Next Stories
1 अतिरिक्त उत्पादनामुळे सहकारी दूध संघ अडचणीत
2 जिल्हा बँकेच्या वसुलीबाबत आज सहकारमंत्र्यांबरोबर बैठक
3 काँग्रेसच्या मोर्चात राष्ट्रवादीने सहभागी व्हावे
Just Now!
X