16 January 2021

News Flash

रायगडावर रितेशचा महाराजांच्या पुतळ्यासोबत सेल्फी, शिवप्रेमी संतापले

रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी रायगडावरील मचाणीवर असलेल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढला सेल्फी

Actor Riteish Deshmukh & Ravi Jadhav Visited Raigad Fort:

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत असल्याची बातमी सिने प्रेक्षकांसाठी नवीन नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या सिनेमाचे शुटिंगही सुरु झाल्याचे समजते. मात्र या सिनेमाच्या टीमने नुकतीच स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला दिलेली भेट वादात सापडली आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे शिवभक्त दोघांवर चांगलेच संतापले. त्यामुळेच रितेशने ट्विट केलेले फोटो डिलीट केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात रितेश महाराजांची भूमिका साकारत असल्याचे समजते. याच निमित्ताने या टीमने काल म्हणजेच ५ जून रोजी रायगडाला भेट दिली. यावेळी रितेशबरोबर रवी जाधव, ऐतिहासिक कांदबरीकार विश्वास पाटील आणि टीममधील इतर सहकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी काढलेले काही फोटो रितेशने आज पहाटेच्या सुमारास ट्विट केले. हे ट्विट रवी जाधव यांनीही रिट्वीट करुन आपल्या प्रोफाइलवर पीन केले. मात्र या फोटोंवर शिवप्रेमी चांगलेच संतापले.

रितेशने ट्विटरवर रायगड भेटीचे तीन फोटो ट्विट केले. यापैकी एका फोटोत रितेश आणि रवी जाधव यांनी रायगडावरील मचाणीवर असलेल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेला सेल्फी होता. तर दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम महाराजांचे सिंहासन आहे तेथील मचाणीवर चढून रांगेत बसल्याचे दिसत होते.

दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम महाराजांचे सिंहासन आहे तेथील मचाणीवर चढून रांगेत बसल्याचे दिसत होते.

तिसऱ्या फोटोमध्ये हीच टीम मागे धुके असून गडाच्या कठड्याजवळ उभी असल्याचे दिसते. अगदी रात्री केलेल्या या ट्विटवर सकाळपर्यंत अनेकांनी आक्षेप नोंदवला. ज्या चरणांवर सर्व शिवभक्त आपले मस्तक टेकवतात तेथे जाऊन फोटो काढण्याची काय गरज होती असा सवाल करत शिवभक्तांनी आपला आक्षेप नोंदवला.

रवी जाधव यांनी कोट केलेले रितेशचे ट्विट… रितेशने हे ट्विट डिलीट केले आहे.

महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याबरोबर काढलेला हा फोटो चुकीचे असल्याचे मत अनेकांनी नोंदवले. अशाप्रकारच्या अनेक कमेन्ट आल्यानंतर अखेर रितेशने मराठीमधील ते ट्विट काढून टाकले असून सध्या त्याच्या ट्विटर अकाऊण्टवर या भेटीसंदर्भातील केवळ इंग्रजीमधील ट्विट दिसत आहे. या ट्विटमध्ये रितेश म्हणतो की, आज सकाळी मराठा सम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडाची भेट घेतली. श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतात जन्मलेल्या सर्वात महान योद्धांपैकी एक आहेत. माहराजांच्या मुर्तीसमोर नतमस्तक होऊन घेतलेला आशिर्वाद तुम्हाला सशक्त बनवतो.’ रितेशने या मजकूरासह महाराजांच्या चरणावर नतमस्तक होताना आणि भगव्या झेंड्याबरोबरचा स्वत:चा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटला हजारोच्या संख्येने लाइक्स आणि रिट्वीट मिळाले आहेत.

रितेशने मराठीमधील ट्विट काढून टाकले असले तरी काहीजणांनी ते फोटो समाजमध्यमांवर पोस्ट करत या तिघांवर टिका केली आहे. तर काहींनी कमीत कमी पाटील यांनी तरी इतरांना फोटो काढताना समज द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 10:17 am

Web Title: actor riteish deshmukh director ravi jadhav visited raigad fort posted a selfie with shiavji maharaj statue got criticize by shiavji followers
Next Stories
1 फ्लॅशबॅक : नायक नही ‘खलनायक’ हू मैं…
2 Dhadak song Pehli Baar: ‘झिंगाट’नंतर आता ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन
3 Chumbak Trailer : अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X