सीताराम चांडे, लोकसत्ता

राहाता : सह्याद्री देवराई अभियानाचे प्रणेते व अभिनेते सयाजी शिंदे, चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी या वर्षीची आषाढी वारी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याची चळवळ राज्यभरात सुरू केली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची आषाढी वारी इतिहासात पहिल्यांदाच खंडित झाली. त्यामुळे वारकऱ्यांनी विठ्ठल वृक्षात पाहून हरित वारीची सुरुवात करून यामध्ये सर्वात जास्त जुन्या झाडाला मिठी मारून त्यातच पांडुरंग शोधावा व झाडाला मिठी मारून सेल्फी काढून सह्याद्री देवराई परिवाराला पाठवा, अशा या चळवळीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यातील या छायाचित्रांचा संग्रह एकत्रित करून सर्वात जुन्या दहा झाडांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

बुधवारी, आषाढी एकादशीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात अभिनेते शिंदे आले होते. तेथे असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा वटवृक्षाचे पूजन त्यांनी केले. त्यांच्यासमवेत कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे, लेखक अरविंद जगताप, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊ त, पेमगिरीचे सरपंच सोमनाथ गोडसे, उमेश बैचे, अर्चना वनपत्रे, शरद गिरी आदी उपस्थित होते

आषाढी वारी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प सह्यद्री देवराई अभियानाचे प्रणेते व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला. वारकऱ्यांनी आपल्या जवळच्या जुन्या झाडाला मिठी मारून त्याचे छायाचित्र काढून त्या झाडाची झाडाची कृतज्ञता व्यक्त करीत पंढरीनाथाचे स्मरण करावे. राज्यातील सर्व छायाचित्रांचा संग्रह एकत्रित करण्यात येऊ न सर्वात जुन्या दहा झाडांचा उत्सव साजरा करण्याचा करण्यात येणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

या वेळी साहित्यिक रंगनाथ पठारे, चित्रपट कथाकार अरविंद जगताप, जयवंत ठाकूर, तुषार गायकवाड, ह.भ.प. रोहीदार बर्गे, ह.भ.प. सुनील मंगळापूरकर, ह.भ.प. सखाराम तांगडे, ह.भ.प. व्यंकटेश सोनवणे, ह.भ. प. अनंत काळे, संदीप सातपुते, हनुमंत उबाळे, सुनील दिघे अनिल राऊ त, सुनील राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षातच विठ्ठल शोधा

सह्याद्री देवराई च्या या उपR मात अनेकांनी सहभाग घेऊ न झाडासोबत सेल्फी काढून, ती छायाचित्रे देवराई परिवाराकडे आलेले असल्याचे सांगून शिंदे यांनी सांगितले, की जे लाखो वारकरी पंढरीच्या वारीला जाऊ  शकत नाहीत. त्यांनी वृक्षातच विठ्ठल शोधावा. वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संवर्धन करावे. आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जुने झाड शोधत आहोत. झाडे खरे सेलिब्रिटी आहेत.