19 September 2020

News Flash

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत शेअर करत कंगना म्हणाली…

कंगनाकडून शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत तुलना वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादातानंतर कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगपालिकेडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर करत कंगनानं शिवसेनेच्या भूमिकेवर टीकेचा बाण सोडला.

“बाळासाहेब ठाकरे हे महान नेते होते आणि माझ्या आवडीच्या, तसंच आदर्श नेत्यांपैकी एक होते. गटातटातल्या राजकारणात शिवसेना सामील होईल आणि ती काँग्रेस बनेल अशी भीती त्यांना वाटत होतं. आता त्यांच्या पक्षाची सद्यस्थिती पाहून त्यांची भावना काय असती?,” असा सवाल कंगनानं केला आहे. कंगनानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेबांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवसेनेचा पळपुटे म्हणून उल्लेख

आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची आई आशा रणौत यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी शिवसेनेचा पळपुटे असा उल्लेख केला. “संपूर्ण भारत आपल्या मुलीचं समर्थन करत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानते. माझ्या मुलीचं संरक्षण केल्याबद्दल भाजपाचे आभार,” असं त्या म्हणाल्या होत्या.

आशा रणौत यांनी यावेळी कंगना मुंबईतच राहणार असल्याची माहिती दिली आहे. “कंगना महाराष्ट्रातच राहणार आहे. १५ वर्षांपासून ती मुंबईत असून अर्ध आयुष्य तिने तिथंच घालवलं आहे. महाराष्ट्र हा सर्वांसाठी आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी आमचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतं. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:16 pm

Web Title: actress kangana ranaut shares balasaheb thackeray interview criticize shiv sena uddhav thackeray congress pok mumbai statement jud 87
Next Stories
1 कंगना रणौतच्या आईची शिवसेनेवर टीका, ‘पळपुटे’ उल्लेख करत म्हणाल्या…
2 तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी
3 “…म्हणून वेगवेगळ्या माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते,” शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप
Just Now!
X