26 September 2020

News Flash

महाराष्ट्रात वाढते आहे ठाकरे सरकारची दहशत-कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतचा पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात ठाकरे सरकारची दहशत वाढत चालली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणौतने केली आहे. आज एका निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. एका माणसावर सुमारे ८ ते १० लोकांनी हल्ला केला. त्यांची चूक इतकीच होती त्यांनी सरकारची निंदा केली. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. ही बाब योग्य नाही असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कंगना रणौतने तिच्या फेसबुक पेजवरुन यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडीओ

अर्णब गोस्वामी यांचं रिपब्लिक चॅनलही बंद करण्यात येतं आहे असाही आरोप कंगनाने केला आहे. अर्णब गोस्वामी हे सेल्फमेड आहेत. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही कंगनाने म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या गुंडांना आवरा असं म्हणत एक ट्विट केलं होतं. आता कंगना रणौतने फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करुन दिवसेंदिवस ठाकरे सरकारची दहशत वाढत असल्याची टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. खासकरुन कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर ट्विटर वॉरच रंगलं होतं. दरम्यान या सगळ्या वादानंतर मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असे कंगनाने म्हटले होते. कंगना ज्या दिवशी मुंबईत आली म्हणजेच ९ सप्टेंबरला मुंबईत आली त्यादिवशी तिचं मुंबईतील ऑफिस पाडण्यात आलं. यावरुनही तिने ठाकरे सरकारवर टीका केली होती. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणी कंगनाची भेट घेतली आणि तिला पाठिंबाही दर्शवला होता. आता एका निवृत्त अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरुन कंगना रणौतने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे असा आरोप कंगनाने केला आहे. आता कंगनाच्या या आरोपांना शिवसेनेकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 11:21 pm

Web Title: actress kangana ranaut slams thackeray government on ex officer beaten issue scj 81
टॅग Kangana Ranaut
Next Stories
1 शासकीय प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर करोना चाचणी दर आता १४८ रुपये!
2 मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही-उद्धव ठाकरे
3 महाराष्ट्रात २४ हजार ८८६ नवे करोना रुग्ण, संख्या १० लाखांच्या पुढे
Just Now!
X