News Flash

इचलकरंजीला पाणी देऊनही दूधगंगा नदीत पुरेसा साठा ; पाटबंधारे विभागाचा निर्वाळा

इचलकरंजी पाणी योजना होण्यास अडचण नसल्याचेही सांगितले.

इचलकरंजी शहरासाठीची दूधगंगा नदीवरील सुळकुड नळपाणी योजना कार्यान्वित झाली, तरी पिण्यायासाठी राखीव असलेल सुमारे अर्धा टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे इचलकरंजी पाणी योजना होण्यास अडचण नाही. नदीतपुरेसा पाणीसाठा आहे, असा निर्वाळा पाटबंधारे विभागाच्यावतीने मंगळवारी देण्यात आला. यामुळे इचलकरंजी विरुद्ध कागल असा सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे आहेत.

इचलकरंजी योजनेचा आढावा घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी  येथे बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी ही माहिती दिली. सर्वांचा गैरसमज दूर करुन योजना निश्चितपणे कार्यान्वित होईल, असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला. बैठकीस नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, मदन कारंडे, रविंद्र माने, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, अशोक स्वामी उपस्थित होते.

सर्व विभागाच्या एकत्रित मान्यतेनंतर योजनेला मंजुरी मिळाली आहे. 31 जुलैपूर्वी जीवन प्राधिकरणाने अहवाल सादर करावा . सध्या शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. कागल, शिरोळच्या शेती सिंचनासाठी असलेल्या आरक्षित पाण्याला धक्का न लावता पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी इचलकरंजी शहरासाठी देण्यात येणार असल्याचे माने यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सुळकुडच्या पुढे नवीन बंधार बांधून पाणी उचलण्यात येणार आहे. समरजीत घाटगेंचा गैरसमज दूर करु, असे नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 6:38 pm

Web Title: adequate reserves in dudhganga river despite providing water to ichalkaranji msr 87
Next Stories
1 वर्धा : संकेतस्थळ बंद पडल्याने युनियन बँकेचे कामकाज आठ दिवसापासून बंद
2 राज्यात २४ तासांत आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह
3 मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय
Just Now!
X