कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतिपदासाठी आघाडीतून राष्ट्रवादीच्या आदिल फरास यांनी बाजी मारली. त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या नगरसेविका मृदुला पुरेकर यांचा १३ विरुद्ध २ मतांनी पराभव केला. तर परिवहन समिती सभापती निवड आघाडीचे उमेदवार अजित पवार यांचा अर्ज अपात्रतेच्या कारणावरून न्यायप्रविष्ट झाल्याने ही निवडणूक शुक्रवार (दि. ९) रोजी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. तर महिला व बालकल्याण सभापतिपदी लीला धुमाळ यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
विषय समिती सभापती निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली समितींच्या सभा पार पडल्या. यामध्ये स्थायी समिती सभापतीसाठी राष्ट्रवादीचे आदिल फरास यांचा अर्ज काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने दाखल होता. तर जनसुराज्यच्या मृदुला पुरेकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना केवळ शिवसेनेच्या संभाजी जाधव यांचे एक व स्वत:चे अशी दोनच मते मिळाली तर त्यांना अनुमोदक असलेल्या प्रभा टिपुगडे यांनी गरहजर राहणे पसंत केले. त्यामुळे आघाडीचे आदिल फरास स्थायी समिती सभापतिपदी विराजमान झाले.  मृदुला पुरेकर यांचे बंड अयशस्वी ठरले. त्यांना त्यांच्या जनसुराज्यकडूनही मदत झाली नाही.
आज सकाळी ११ वाजता सहलीवर गेलेले सर्व नगरसेवक महापालिकेच्या आवारात आले आणि थेट सभागृहात गेले. यावेळी पीठासन अधिकारी राजाराम माने यांनी निवडणुकीच्या प्रकियेस सभागृहात प्रारंभ केला. हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे आदिल फरास यांना ज्योत्स्ना मेढे पोवार, जयश्री साबळे, कांचन कवाळे, माधुरी नकाते, संगीता देवेकर, दीपाली ढोणुक्षे, दिगंबर फराकटे, प्रकाश गवंडी, शारंगधर देशमुख, सर्जेराव पाटील, इंद्रजित बोंद्रे, सचिन चव्हाण आणि स्वत:चे अशी १३ मते मिळाली तर विरोधी पुरेकर यांना संभाजी जाधव आणि स्वत:च्या एका मतावर समाधान मानावे लागले. महिला आणि बालकल्याण समिती सभापतिपदासाठी लीला धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बिनविरोध घोषित केली.
परिवहन समिती सभापतिपदासाठीच्या निवडीला मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने ९ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. या समितीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसच्या अजित पवार धामोडकर यांनी अर्ज केला होता. अपक्ष निवडून आलेले प्रकाश नाईकनवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडीत अजित पवार यांचे पारडे जड वाटत होते, मात्र त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वीकृत नगरसेवक शशिकांत पाटील यांची सही असल्याचा आक्षेप घेत नगरसेवक यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी ९ तारखेला होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत या निवडीला स्थगिती देण्यात आली. न्यायालयाच्या निकालानंतर निवडीचा नवीन कार्यक्रम जाहीर होतो का हे पाहावे लागेल.
आदिल फरास यांची स्थायी सभापतिपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. यानंतर त्यांची उघडय़ा जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. तर महिला बालकल्याण सभापती लीला धुमाळ यांनी मात्र नेहमीप्रमाणे साधेपणा जपला.
 

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
Solapur ram Satpute
सोलापुरात भाजप उमेदवार सातपुतेंच्या गाठीभेटी सुरू, काशी जगद्गुरूंचे घेतले आशीर्वाद
Parbhani Lok Sabha
परभणीत महायुतीचे धक्कातंत्र