News Flash

डोंगरीतील वाळीत प्रकरणात समेट घडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

रोहा तालुक्यातील डोंगरी येथील २२ कुटुंबांना गावकीने वाळीत टाकल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर येताच पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

| January 12, 2015 12:30 pm

रोहा तालुक्यातील डोंगरी येथील २२ कुटुंबांना गावकीने वाळीत टाकल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर येताच पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. दोन्ही गटांच्या ग्रामस्थांना एकत्र आणून हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. वरकरणी समेट झाल्याचे दिसत असले तरी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे.     डोंगरी गावातील तब्बल २२ कुटुंबांना वेगवेगळ्या कारणांमुळे बहिष्कृत करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी गावातील गणपत मढवी, सतेज िशदे, केशव मढवी यांच्याबरोबर राजेंद्र िशदे याचे हनुमान पालखीच्या वेळी भांडण झाले. तेव्हा राजेंद्र िशदे याने गावकी जमवून या तिघांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. जिल्हा परिषद निवडणुकीत या गावातील गणेश मढवी हे उभे होते. त्यांचा पराभव झाला. त्यांना गावातील काही लोकांनी मतदान केले नाही. यासंदर्भात गावातील नागरिकांनी मतदानासंदर्भात गावच्या देवीसमोर शपथ घेण्याचा निर्णय गावकीने घेतला मात्र त्याला गावातील काहींनी विरोध केला. त्या आठ कुटुंबांना गावकीने वाळीत टाकले.    वनविभाग व खारभूमीच्या कामाची माहिती सीताराम िशदे यांनी मागितली होती. केवळ ही माहिती मागवताना गावकीला विचारले नाही म्हणून सीताराम िशदे यांना एक हजार ५० रुपये दंड सुनावण्यात आला. परंतु िशदे यांनी तो भरला नाही म्हणून त्यांना बहिष्कृत करण्यात आले. गावातील सत्यवान मढवी यांना काही कारणास्तव वाळीत टाकण्यात आले होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा गावकीने त्यांच्या धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्यास मनाई केली. जर पाच हजार रुपये दंड भरला तरच तुम्हाला सर्व विधींमध्ये सहभागी होता येईल, असे गावकीने सांगितले. हे प्रकरण आता चव्हाटय़ावर आल्यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकाऱ्यांनी आज रोहा प्रांताधिकारी कार्यालयात दोन्ही बाजूंची एकत्रित बठक घेतली. या बठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यातील मुद्दय़ांवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे ठरले. त्यानंतर डोंगरी गावातील हनुमान मंदिरात ग्रामस्थांची बठक घेण्यात आली. या बठकीत दोन्ही बाजूंच्या प्रमुखांनी आपले विचार मांडून एकत्र राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.    या बठकीला रोह्याचे प्रांताधिकारी सुभाष भागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या प्रयत्नांतर गावात एकोपा झाल्याचे चित्र दिसत असले तरी मने कितपत जुळली आहेत ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश आले आहे का हे लवकरच समजणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2015 12:30 pm

Web Title: administration try to make reconciliation in social boycott case of dongri
Next Stories
1 सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न
2 गझलने भावभावनांना नाजूक तलम पोत दिला
3 संघाच्या कानपिचक्या
Just Now!
X