News Flash

मुदत संपलेल्या दीड हजार ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय

आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळणार

हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

राज्यातील मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आणखी वाचा- टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणार; राज्यातील पहिलाच प्रयोग!

त्याचबरोबर कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची यावेळी घोषणा करण्यात आली. याचा लाभ राज्यातील १३,५०० आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर यांना मिळणार आहे.

आणखी वाचा- करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता वितरितही करण्यात आला आहे. दरम्यान, करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन मिळणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:51 pm

Web Title: administrators to be appointed on one and a half thousand expired gram panchayats cabinet decision aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Unlock 1.0 : दुकानं उघडण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी; नवी नियमावली जाहीर
2 खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, राज्य सरकारचा आदेश जारी
3 राज्यात ५०० डॉक्टरांना करोनाचा संसर्ग; सायन रुग्णालयातील संख्या सर्वाधिक
Just Now!
X