News Flash

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची प्रवेश पत्र उपलब्ध

संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेस सोबत आणणे अनिवार्य

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे कळवण्यात आले आहे.

याबरोबर प्रवेश प्रमाणपत्राशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, परीक्षेस येतांना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचा फोटो व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे इत्यादी सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.

प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास अर्ज सादर केल्याच्या तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या दिलेल्या ईमेल व दूरध्वनी क्रमांकावरून आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल, असे देखील कळण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 3:41 pm

Web Title: admission letter available for pre examination msr 87
Next Stories
1 करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराचे केंद्राचे धोरण जाहीर!
2 …तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल; फडणवीसांना काँग्रेसचा सल्ला
3 जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती
Just Now!
X