05 July 2020

News Flash

रत्नागिरीत आज डॉ. जावडेकर सादर करणार ‘लयपश्चिमा’

सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा.

अनुभव उलगडणारा बहुपेडी कार्यक्रम

आजची तरुण पिढी ज्या धुंद सुरांवर डोलते, ज्या तालावर थिरकते त्या विविध पाश्चिमात्य संगीत प्रकारांची माहिती देणारा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘लयपश्चिमा’ कार्यक्रम आज (३१ ऑक्टोबर) रत्नागिरीत होणार आहे. आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे उद्या सायंकाळी ७ वाजता हरी ॐ मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये व्हिडीओ व ऑडिओ क्लिप्सच्या साहाय्याने पॉप, रॉक, जॅझ, हिपहॉप इत्यादी संगीत प्रकारांचा मागोवा घेतला जाणार आहे. या नुसत्या सुरावटी नाहीत तर त्यातील रंगीबेरंगी स्वरचित्र शब्दातून रसिकांसमोर मांडण्यात येतात. डॉ. जावडेकर यांचे ‘लयपश्चिमा’ हे पुस्तक २५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले. पाश्चात्त्य जनसंगीताकडे सांगीतिक आणि सामाजिक नजरेने केलेले लेखन या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. डॉ. जावडेकर कधी निवेदन, कधी अभिवाचन तर कधी संवाद साधत हा कार्यक्रम श्रोत्यांसमोर उलगडतात. ‘नवे सूर नवे तराणे’ हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक तर ‘मुळारंभ’ ही कादंबरी प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यासाठी त्यानी संगीत दिग्दर्शन केले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीतील विविध संगीतप्रकार तेथील जीवनशैलीशी असणारी सांगड, त्याची माहिती देणारा अनुभव उलगडणारा बहुपेडी कार्यक्रम आहे. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 12:50 am

Web Title: adv javdekar presents laypashima in ratnagiri
Next Stories
1 वामन पंडित यांचे रानफुलं छायाचित्र प्रदर्शन सुरू
2 डाळीऐवजी चिपळुणात सापडला तेलाचा साठा
3 निकृष्ट बस खरेदीमुळे पालिका परिवहनला फटका
Just Now!
X