News Flash

रत्नागिरीत आज वकील परिषद

न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सशक्त न्यायव्यवस्थेची मूलभूत गरज आहे. न्यायव्यवस्थेची

| September 15, 2013 02:29 am

न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सशक्त न्यायव्यवस्थेची मूलभूत गरज आहे.
न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता वाढविणे समस्त वकीलवर्गाची जबाबदारी आहे. ‘न्यायदानासाठी लागणारा विलंब आणि उपाययोजना’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील वकिलांची परिषद आज, रविवारी सकाळी १० वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े, सभागृह, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सुवर्णमहोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित या वकील परिषदेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. पी. सौदुरबलदोटा यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. ए. आर. जोशी, विधी न्याय विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत, महाअधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, तसेच रत्नागिरी जिल्हा सत्रन्यायाधीश मकरंद केसरकर उपस्थित राहणार आहेत.
न्यायदानातील विलंब व उपाययोजना या विषयावरील परिसंवादात माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड्. राजेंद्र रघुवंशी, अ‍ॅड्. केतन घाग, अ‍ॅड्. श्रीकांत गडकरी, अ‍ॅड्. ए. यू. पठाण भाग घेणार आहेत, तसेच जलद व पारदर्शक न्यायदानासाठी आवश्यक बदल या विषयावरील परिसंवादात महाअधिवक्ता नाडकर्णी, अ‍ॅड्. सुरेशचंद्र भोसले, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड्. संजय बोरकर आदी मान्यवर भाग घेणार आहेत.
तर सायंकाळच्या खुल्या सत्रात ‘वकिलांच्या अडचणी व समस्या’ या विषयावर चर्चा होणार असून यामध्ये महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड्. प्रमोद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड्. बिपीत बेंडाळे, भारतीय वकील पषिदेचे सदस्य अ‍ॅड्. सतीश देशमुख हे सहभागी होणार आहेत.
वकील परिषदेचा समारोप सायं. ४.३० ते ५ या वेळेत होणार असून या वेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांचा तसेच महार7ाष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या सदस्यांचा सत्कार होणार आहे.
 जिल्हा सत्रन्यायाधीश मकरंद केसरकर, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड्. प्रमोद पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेला सर्व वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष अ‍ॅड्. विलास पाटणे, अ‍ॅड्. ए. यू. पठाण, अ‍ॅड्. अशोक कदम व अ‍ॅड्. प्रमोद पाटील यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:29 am

Web Title: advocate convention in ratnagiri today
Next Stories
1 भगवा फडकवीत ठेवण्याचे सेनेपुढे आव्हान!
2 मनपा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडीच व्हावी- आदिक
3 साईबाबाकडे फुटीरवाद्यांशी समन्वयाचे काम
Just Now!
X