गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या राजदला मागे टाकत जदयू आणि भाजपा यांनी आघाडी घेतलेली असली तरीही अद्याप बिहारचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानेही यंदा बिहारमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. फडणवीस यांनीही बिहारमध्ये प्रचारसभांडा धडाका लावत चांगली कामगिरी केली. फडणवीसांनी सभा घेतलेल्या काही मतदारसंघातही भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांचं कौतुक करत…देवेंद्रजींनी बिहार आणलं, महाराष्ट्रातही तेच हवेत असं म्हटलं आहे.

अनेक एक्झिट पोलमध्ये तेजस्वी प्रताप यांना जनता पसंती दर्शवले असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतू आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार बिहारची निवडणूक रंगतदार होत असली तरीही जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भाजपालाच आपली पसंती दर्शवल्याचं पहायला मिळतंय.