News Flash

‘लक्ष्मीदर्शना’चा सल्ला भोवला; रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल

लक्ष्मीचे स्वागत करण्याचा वक्तव्यामुळे दानवे अडचणीत

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी दर्शनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दानवेंच्या विरोधात पैठणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ १७ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी ‘लक्ष्मीदर्शना’संबंधी वक्तव्य केले होते. ‘निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा,’ असे वक्तव्य दानवे यांनी केले होते.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने रावसाहेब दानवे यांना नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीनंतर दानवेंनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिले होते. मात्र दानवे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही. त्यामुळे बुधवारी रावसाहेब दानवेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे पैठणमधील पोलीस ठाण्यात दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मतदानाच्या आदल्या दिवशीची सायंकाळ महत्त्चाची असते. यावेळी लक्ष्मीदर्शन होते. लक्ष्मी घरात येते. तिला स्वीकारा,’ असे वादग्रस्त विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. मात्र या वक्तव्यावरुन वाद होताच ‘लक्ष्मीदर्शनाचा अर्थ पैसे होत नाही. मी पैसे घ्या असे मतदारांना म्हटलो नव्हतो,’ अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवेंनी केला होता. निवडणूक आयोगाला दानवेंनी हेच स्पष्टीकरण दिले होते.

विरोधकांसह शिवसेनेने रावसाहेब दानवे यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. याप्रकरणी रावसाहेब दानवेंनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दानवेंच्या उत्तराने निवडणूक आयोगाचं समाधान झाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:07 pm

Web Title: after election commission order fir registered against bjp maharashtra president raosaheb danve
Next Stories
1 मोहिते-पाटील शांतच
2 सूतगिरणीतून सूतजुळणी अधिक घट्ट!
3 गुलाबी बोंडआळीमुळे  बीटी कापूस धोक्यात
Just Now!
X