महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. याचा परिणाम होणार असल्याने राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पुढे घ्याावी अशी मागणी मराठा समाजाच्या युवकांतून होत होती. त्यासाठी आंदोलन केले जात होते.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा पुढे ढकलली जात असल्याची घोषणा केली. त्यावर मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष ऋतुराज माने, प्रतिकसिह काटकर, मंदार पाटील यांच्यासह कार्यकर्ते दसरा चौकात जमले. राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ त्यांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा हजारावर विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 11:12 pm