28 November 2020

News Flash

कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख बहिणींना वाटणार साड्या

भाऊबीजेच्या दिवशी एक लाख साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधील विजयानंतर एक लाख सांड्याचे वाटप करणार आहेत. पुणे मिररच्या वृत्तानुसार, चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटपाची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर सोपवली आहे. कोथरूडमध्ये २४ पैकी भाजपाचे १८ नगरसेवक आहेत. भाऊबीजेच्या दिवशी एक लाख साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

पण महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याचा पाटील यांचा उपक्रमाला स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. नगरसेवकांच्या मार्फत काही वस्ती भागातील महिलांना साड्या देण्याचा पाटील यांचा उद्देश आहे. मात्र. काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात याला विरोध दर्शवला आहे. येथील दोन-तीन हजार महिलांना साड्या दिल्या तर उर्वरीत महिलांना साड्या कोण देणार? त्यांचा रोष कोण पत्करणार? असा सवाल स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. या संदर्भात मोठं राजकीय नाट्यही घडले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. विजयानंतर पाटील यांनी महिला मतदारांना साड्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:34 pm

Web Title: after victory in kothrud chandrakant patil to gift one lakh sarees nck 90
Next Stories
1 दिवाळी भेट ! बहुप्रतिक्षित विमानसेवेला अखेर सुरूवात, नाशिक-पुणेकरांना दिलासा
2 पुण्यातील दिवाळी फराळाची परदेशामध्ये गोडी!
3 मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी पुण्यात साजरी केली दिवाळी
Just Now!
X