03 March 2021

News Flash

यशवंतराव चव्हाण समाधी परिसर आंदोलनं, सभांसाठी प्रतिबंधित क्षेत्र

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात आंदोलने, मोर्चा, धरणे, राजकीय सभा आदी होत असल्याने तेथे कोणतीही अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त असल्याने हे ठिकाण

| June 25, 2014 01:54 am

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात आंदोलने, मोर्चा, धरणे, राजकीय सभा आदी होत असल्याने तेथे कोणतीही अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त असल्याने हे ठिकाण आंदोलनं, मोर्चे, धरणे, उपोषणं, राजकीय सभा, मेळावे जाहिरात फलकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करून तेथे केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय कराड पालिकेच्या सभेत घेण्यात आला. शहर परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. वैशिष्टय़पूर्ण योजनेतून दहा लाख रुपये खर्चून शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यास मंजुरी देण्यात आली.
रेंगाळलेल्या चोवीस तास नळपाणी योजनेच्या कामास ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देत, तोपर्यंत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला दररोज एक लाखाचा दंड करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णयही या वेळी डिसेंबपर्यंत ही योजना मीटर लावून पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. वैशिष्टय़पूर्ण योजनेतून पालिकेला मिळालेल्या सुमारे २ कोटी रुपयातून कामे मंजूर करण्यात आली. शहरात पाणीयोजना, भुयारी वीज वाहिनीच्या कामाच्या वेळी काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मात्र, दोन वर्षांत त्या खड्डय़ांना मुरूम मिळाला नसल्याचा आरोप श्रीकांत मुळे यांनी केला. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास पालिकेकडून मुरूमही मिळत नसल्याच्या विरोधकांच्या मुद्यांवरून सभेत चर्चा होताना प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 1:54 am

Web Title: agitation on yashwantrao chavan memorial area 3
Next Stories
1 शेतीच्या वादातून आजीचा खून, नातवाला अटक
2 शतकोटीचा बोजवारा, आता ग्रुपिंगची लगबग!
3 प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढवू नये-विखे
Just Now!
X