News Flash

जळगावमध्ये उद्या शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन

आकाशवाणी चौकातील लाडवंजारी मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या कृषी व महसूल विभागाच्या वतीने २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता येथील आकाशवाणी चौकातील लाडवंजारी मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी महसूलमंत्री एकनाथ खडसे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, खा. ए. टी. पाटील, खा. रक्षा खडसे, आ. शिरीष चौधरी, आ. अपूर्व हिरे, नाशिक विभाग महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या वेळी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच कृषी प्रदर्शनात साहित्य, उपकरणे, बियाणे आदींची मांडणी करण्यात येणार आहे. मेळावा तसेच कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 1:12 am

Web Title: agriculture exhibition in jalgaon
Next Stories
1 कराड, मलकापूर पालिकांविरुद्ध पाणी प्रदूषणप्रकरणी गुन्हा
2 राज्य उन्हाने होरपळले
3 तब्बल ९२ लाखांचा हिरा साईचरणी अर्पण