News Flash

कर्जत-जामखेडच्या कोरडवाहू क्षेत्रात ‘कृषी क्रांती’

कोरडवाहू असलेल्या जमिनीवर नवीन वाण,तंत्रज्ञान, माहिती देण्यासाठी गावनिहाय शेतकरी बैठका घेऊन त्यांनी अर्थकारणाचा खरा अभ्यास शेतकऱ्यांना शिकवला आहे.

कर्जत :  आ. रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या आरोग्यावर विशेष लक्ष देत असले तरी यांचे वडील कृषिरत्न राजेंद्र पवार हे देखील कर्जत—जामखेडच्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करून कृषिक्रांती प्रत्यक्षात आणत आहेत. कोरडवाहू असलेल्या जमिनीवर नवीन वाण,तंत्रज्ञान, माहिती देण्यासाठी गावनिहाय शेतकरी बैठका घेऊन त्यांनी अर्थकारणाचा खरा अभ्यास शेतकऱ्यांना शिकवला आहे.

बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी तूर संशोधन बदनापूर,औरंगाबाद या संशोधन केंद्राने विकसित इऊठ —७११ या तुरीच्या वाणाचा नफा तोटा समजावून सांगत आज कर्जतमध्ये १२५६० एकर आणि जामखेडमध्ये १२५०० एवढय़ा क्षेत्रावर लागवड करण्यात आली.

या भागामध्ये मुख्यत: खडका हा वाण लागवड केला जात होता. यामध्ये साधारण एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळत होते परंतु बीडीएन—७११ हा तुरीचा वाण १३ ते १४ क्विंटल इतके उत्पादन देत आहे. हा फरक पाहून शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर या वाणांची लागवड केली आहे. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती,कर्जत—जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीपपूर्व पीक नियोजन अभियान २०२० आयोजित करण्यात आले होते. दोन्ही तालुक्यातील मुख्यत: तूर,उडीद,मूग,कांदा,तसेच फळबागेमध्ये लिंबू,पेरू, सीताफळ, डाळिंब, अंजीर अशी पीकपद्धती आहे. उडीदाचेही साधे वाण पेरण्याकडे जास्त कल होता. परंतु डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेल्या उडदाचे टीएयू—१ हे वाण मोठय़ा प्रमाणत उत्पादन देणारे ठरले आहे. साध्या वाणाचे ४ क्विंटल तर टीएयू—१ या वाणाचे एकरी ६ क्विंटल उत्पादन वाढले आहे. यामुळेच कर्जतमध्ये ११,२५० एकर आणि जामखेडमध्ये ५५,००० एकर एवढी उडदाची लागवड करण्यात आली. फळबागेमध्येही लिंबू संशोधन केंद्र नागपूर यांनी लिंबाची विकसित केलेली एनआरसीस ७, एनआरसीसी— ८ व साई सरबती या वाणाची ४८०० रोपे लागवड करण्यात आली. यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळजवळ ४ कोटींची वाढ झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:09 am

Web Title: agriculture revolution in karjat jamkhed arid region ssh 93
Next Stories
1 लातूरमध्ये मागणीच्या केवळ ७० टक्के प्राणवायू पुरवठा
2 दिलासादायक : राज्यात दिवसभरात ८२ हजार २६६ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के
3 ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद!
Just Now!
X