News Flash

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याचे वृत्त तथ्यहीन – जयंत पाटील

जयंत पाटील यांनी ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली असल्याची तथ्यहीन वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहेत असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा कॉंग्रेसला सोडल्याची वृत्तं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्या वृत्ताबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करूनही यासंदर्भातली माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 11:59 pm

Web Title: ahamednagar seat for congress from ncp is wrong news says jayant patil
Next Stories
1 अभिनंदन सुखरुप परतले यांचा मनसेला मनापासून आनंद – राज ठाकरे
2 शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का आला? – माधव भांडारी
3 लहानपणी शरद पवारांच्या गाडीमागे धावत होतो आणि आता…- अमोल कोल्हे
Just Now!
X